नोटांसारखं आता चिल्लरही काढता येणार; रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | अनेकदा एखाद्या शुल्लक कारणासाठी आपल्याला चिल्लर नाणी (Chillar coins) लागतात. सुट्टे पैसे हवे असल्यास आता आपल्याला इतरांकडून चिल्लर नाणी मागण्याची गरज भासणार नाही. आता थेट बँकेतून तुम्हाला एटीएमसारखे चिल्लर नाणी काढता येणार आहेत. देशातील नाण्याची कमतरता दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाची घोषणा केली आहे.

आता आरबीआय (RBI) 12 शहरांमध्ये QR कोड काॅईन वेंडिंग मशीनसाठी पायलट प्रोजेक्ट सुरु करणार आहे. यापुढे कोणतीही व्यक्ती QR कोड स्कॅन करुन आणि UPI द्वारे पेमेंट करुन नाणे वेंडिंग मशीनमधून नाणी काढू शकेल. लवकरच या पायलट प्रोजेक्टची सुरुवात केली जाईल अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिली.

क्युआर कोडवर आधारित काॅईन व्हेंडींग मशीन (Coin vending machine) 12 शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. याच्यामुळे नाणी मिळणे, मशीन वापरुन नाणी वितरित करणे सोप होईल. काॅईन व्हेंडिंग मशीन ही स्वयंचलित मशीन असणार आहे, चलनी नोटांच्या बदल्यात नाणी वितरित करेल.

ही व्हेंडिंग मशीन बँक नोटांऐवजी UPI वापरुन ग्राहकाच्या खात्यातून पैसे घेतील आणि त्या मूल्याची नाणी देतील. यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होईल. पायलटकडून मिळालेल्या अनुभावाच्या आधारे, या मशीन्सच्या वापर करुन नाण्यांच्या वितरणास प्रोत्साहन देण्यासाठी बँकाना (to the banks) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या