अजित पवार राज ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत?
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी (Ajit Pawar) वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे.
पुण्यात एका विवाह सोहळ्या निमित्ताने वसंत मोरे (Vasant More) आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी तात्या कधी येताय. वाट पाहतोय, अशी ऑफरच वसंत मोरे यांना दिली.
मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्क नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षाकडून सुरु झाली आहे. त्यात मनसेकडूनही पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे जर वसंत मोरे राष्ट्रवादीत गेले तर पुण्यात मनसे खिळखिळी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोरे हे आधीच मनसेत नाराज आहेत. त्यात आता त्यांना थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच पक्षात येण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने तात्या अर्थात वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- फडणवीसांनी चालवलेल्या ‘त्या’ महागड्या गाडीची होतेय जोरदार चर्चा
- ‘…तेव्हा लोकांना कळेल’; ऋतुराज सोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सायलीचा खुलासा
- 10 हजारच्या गुंतवणुकीतून मिळाला 13 कोटींचा फंड!
- ‘बिनडोक राज्यपाल चालणार नाही’; उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
- “…म्हणून हिंदूंनी मुलींचं लग्न 18 व्या वर्षी लावून दिलं पाहिजे”
Comments are closed.