मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे.
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू, असं अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानियांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिला आहे. यानंतर अनेक राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, अंजली दमानिया यांच्या या ट्विटवर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- मराठी कलावंतांसाठी प्रिया बेर्डे रडल्या, सांगितल्या दयनीय व्यथा!
- 17 तास नॉट रिचेबल का होते?, अखेर अजित पवारांनी सांगितलं कारण
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; दोन दिवस ‘हा’ रोड असेल बंद
- ‘सेक्स ही सर्वात सुंदर गोष्ट आहे…’; पोप फ्रान्सिस यांचं वक्तव्य चर्चेत
- युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदेंचा अचानक मृत्यू!