‘अमरावतीत हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, त्यांना महायुतीमधीलच नेते बच्चू कडू यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बच्चू कडू यांनी थेट राणा यांच्याविरोधात दिनेश बुब यांना उभं केलं आहे. त्यांनी महायुतीलाच आव्हान दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत बच्चू कडू आणि राणा पती-पत्नी यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. काल तर येथे सभा स्थळावरून मोठा राडा झाला. ज्या सभेसाठी बच्चू कडू यांनी अगोदरच बूकिंग केलं होतं तिथे भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेची तयारी करण्यात आली. यावरून बच्चू कडू चांगलेच भडकले. इतकंच नाही तर ते थेट पोलिसांनाही भिडले.

यावरून पुन्हा एकदा नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. आज (24 एप्रिल)प्रहारच्यावतीने अमरावतीत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बच्चू कडू आपली पुढची भूमिका मांडणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बच्चू कडू यांचा मोठा दावा

“मला अजूनही भिती आहे की, 26 तारखेला किंवा उद्या-परवा अमरावतीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते, अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे आम्ही दोन पावलं मागे घेतली. अन्यथा रात्रीच या ठिकाणी आमचे 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. मात्र, कोणताही डाग लागू नये, म्हणून आम्ही दोन पावलं शांततेत मागे घेतली.”, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले.

तसंच पुढे ते म्हणाले की, “कायद्याच्या राज्यात असे झाले तर लोकांना काय संदेश जाईल. यांची दडपशाही सुरु आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. भाजपाची ही संस्कृती नाही. पण युवा स्वाभिमान पक्ष भाजपाला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे. या गोष्टीचा जे न्यायप्रिय लोक आहेत ते नक्की विचार करतील.”, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

बच्चू कडूंचा राणांना इशारा

“नवनीत राणा आणि रवी राणा यांना पराभव समोर दिसत आहे. 23 आणि 24 ला आम्हाला मैदान मिळाले होते. 23 तारखेलाच परवानगी मिळाली होती. मात्र, 23 तारखेला दुपारी सांगितले की तुम्हाला परवानगी नाही आणि आमचा प्रचार थांबवला. पण निवडणूक आहे म्हणून थांबलो, अन्यथा आमचा स्वभाव थांबण्याचा नाही”, असा इशाराच बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिला.

News Title : Bachchu Kadu claims Hindu-Muslim riots may break out in Amravati

महत्त्वाच्या बातम्या-

“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…