काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना मोठा झटका!

नवी दिल्ली | काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांना मोठा धक्का बसलाय. त्यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम (Nalini Chidambaram) यांची कोट्यवधींची मालमत्ता ईडीने जप्त केलीये.

ईडीने (Ed) माजी सीपीआय(एम) आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री दिवंगत अंजन दत्ता यांच्या मालकीची कंपनी अशा ‘लाभार्थी’ची 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटलंय की की मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत 3.30 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 3 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे.

या मालमत्ता शारदा ग्रुप आणि इतरांच्या मालकीच्या होत्या. लाभार्थ्यांमध्ये नलिनी चिदंबरम, देवब्रत सरकार, देबेंद्रनाथ बिस्वास (माजी आयपीएस अधिकारी आणि माजी सीपीआय(एम) आमदार) आणि आसामचे माजी कॅबिनेट मंत्री आणि माजी राज्य काँग्रेस अध्यक्ष यांच्या मालकीचे अनुभूती प्रिंटर आणि प्रिंटर होते.

दरम्यान, ईडीच्या माहितीनुसार शारदा ग्रुपच्या कंपनीने सुमारे 2459 कोटी रुपये जमवले होते. त्यात सुमारे 1983 कोटी रुपये आतापर्यंत हडप करण्यात आलेले आहेत.

या रकमेत व्याज जोडण्यात आलेलं नाही. ईडीने या प्रकरणात आतापर्यंत 600 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More