“अदानींची 30 मिनिटं तरी चौकशी करून दाखवा”
मुंबई | गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अधिपत्याखालील अनेक कंपन्यामधून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. अनेक वर्षांपासून गुंतवणुकदारांना फसवलं जात असल्याचा आरोप हिंडेनबर्ग या अमेरिका स्थित रिसर्च एजन्सीने केला आहे.
एजन्सीने नुकत्याच केलेल्या एका संशोधनाच्या अहवालात हे आरोप करण्यात आले आहेत. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
हिंडेनबर्ग (Hindenberg) या रिसर्च एजन्सीने अदानी समूहावर (Adani Group) फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. मात्र केंद्र सरकारने यासंबंधात काहीही चौकशी केलेली नाही. भाजपने (BJP) अदानींची 30 तास नव्हे 30 मिनिटं तरी चौकशी करून दाखवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
घोटाळा झाल्याचं हिंडेनबर्ग या अमेरिकन एजन्सीने सांगितलं असताना ईडी आणि सीबीआय तिकडे का जात नाही, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.
इतरांच्या मागे ईडी – सीबीआय सारख्या तपासयंत्रणा लावतात. पण देशात एवढा महाघोटाळा झाला असताना केंद्र सरकार गप्प का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.
दरम्यान, राऊतांनी राणेंना देखील प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांना मीच खासदार केलं. त्यांच्यासाठी मीच पैसे खर्च केल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. हे वक्तव्य आता कोर्टात सिद्ध करा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.