Rahul Gandhi | राहुल गांधींना न्यायालयाचा मोठा झटका

सुरत | 23 मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 24 मार्च रोजी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा सदस्यत्व काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना खासदारांना देण्यात येत असलेला बंगला खाली करण्याची नोटीसही बजावण्यात आली होती.

मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 3 एप्रिल रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली होती. मात्र कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा झटका दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करणार आहेत.

2019च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी मोदी सरनेमवरून टीका केली होती. सर्वच चोरांची आडनावे मोदीच का असतात? असा सवाल त्यांनी केला होता.

राहुल गांधी यांच्या विधानाने मोदी समाजाचा अपमान झाल्याचं पूर्णेश मोदी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. तर मी एक राजकारणी आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतो. मी हे वक्तव्य हेतूपूर्वक केलेलं नाही. कोणत्याही समाजाला उद्देशून केलेलं नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-