मुंबई | काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाउन भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मला एकट्यालाचं भाजपासोबत लढाव लागेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. यावेळी वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे देखील होते.
सध्याची राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे कसा लढा देत आहेत, देशाची राजधानी कशाप्रकारे संपवली जात आहे याचे आपण साक्षीदार आहोत. दिवसेंदिवस ईडी, सीबीआय शिवसेना आणि विरोधी पक्षांना टार्गेट करत आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. या लढ्यात आम्ही सगळे एकत्र आहोत, असं वेणुगोपाल म्हणालेत.
वेणुगोपाल यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा ती फक्त मैत्री राहत नाही तर एक नातं असतं. आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र लढू, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-