“राजकारणाचा चिखल केलाय, एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर मनसेने प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून एक ट्विट केलं आहे. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडीओमध्ये देशाचं प्रबोधन करणारा महाराष्ट्र आज चाचपडतोय. राजकारणाचा चिखल केला गेला आहे. तात्काळ निवडणुका घ्या आणि एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा, असं राज ठाकरे भाषणामध्ये बोलताना दिसत आहे.

दरम्यान, सर्व चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलीये. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-