पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आज अजित पवार यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले, त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. अशात अजित पवारांच्या कट्टर समर्थक आमदाराने मोठं वक्तव्य करत अजित पवारांनी पाठिंबा दर्शवलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ, असं ते म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.
अण्णा बनसोडे मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार यांनी आपल्याला मुंबईला बोलवलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जातात. अजित दादा जिथे जातील, तिथे मी जाणार, असं जाहीरपणे बनसोडे ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-