‘माझ्याकडे पक्की माहिती आहे’; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई | माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या सर्व खोट्या आहेत. भाजप (BJP) जाणीवपूर्वक अफवा आणि वावड्या उठवत आहे आणि मतभेत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय.

सध्या ज्या बातम्या येत आहेत त्यातून एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या पोटात गोळा येत असेल. त्यांची अस्वस्थात मी समजू शकतो, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून नक्कीच सुरू आहे. मात्र आमदार फुटले तरी पक्ष फुटणार नाही. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांच्या नावाशी बांधलेला आहे, असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, माझं आज सकाळीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांसोबत बोलणं झालं आहे. अजित पवार हे कुठेही जाणार नाही, असं राऊतांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-