मुंबई | मी कुठेही जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) हा एक परिवार आहे आणि आम्ही परिवार म्हणूनच एकत्रित काम करू, असं स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलंय. यासोबतच आज सकाळपासून सुरु असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिलाय.
पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, पक्षाचं काम करत राहू, असं आश्वासन अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलंय.
मी आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल विनाकारण गैरसमज मी कोणाच्याही सह्या घेतल्या नाहीत. कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.
राज्यात बेरोजगारी, महागाई, अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आदी ज्वलंत प्रश्न असताना लक्ष भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, असं अजित पवार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-