अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करेल अशा चर्चा राज्यात सुरू आहे. असं असताना स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या बाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना फटकारलं आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्याचा पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, तुमच्या पक्षाचं काय बोलायचं आहे ते बोलाना, तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला.

तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं, तसं झालं, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी ठाम आहोत. आमचं वकिलपत्र घेण्याचं कुणी कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडावी, आमची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आमच्याकडे माणसं आहे, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) राऊतांना सुनावलंय.

दरम्यान, आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच राष्ट्रवादीत काम करत आहोत. बातम्यांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, मला आमदार कामानिमित्त भेटले दुसरा अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

महत्वाच्या बातम्या-