राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, बदलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

गहू, हरभरा, मका हे पीक जमीनदोस्त झाले असून, सोंगणीला आलेल्या या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पुन्हा अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल सायंकाळ पासून काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

पावसामुळे शेतात असलेल्या गहू, चना, संत्रा, आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. तसेच उकाड्यापासून त्रस्त शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा, असं चित्रही पाहायला मिळालं.

जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या-