शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा एका वाक्यात पाणउतारा, म्हणाले…

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. कसब्याचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांचं नाव पत्रकारांनी घेताच शहाण्या माणसाबद्दल विचारा, असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून लावतानाच चंद्रकांतदादांचा एका वाक्यात पाणउतारा केला. 

कसब्याची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. ही निवडणूक हिंदुत्वावर गेली की नाही हे मला माहीत नाही. महाविकास आघाडीसाठी सर्व नेते, पदाधिकारी काम करत होते. उमेदवाराबद्दल सर्व स्तरात चांगलं बोललं जात होतं. त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले.

मी लोकांना विचारलं. बहुसंख्य लोकांनी सांगितलं आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही मतदान केलं. धंगेकरांबद्दल लोकांची मान्यता होती. धंगेकरांनी केलेल्या कामाची नोंद या भागातील लोकांनी घेतली, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-