पुणे | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कसबा आणि चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातच कसब्यात भाजपचा(BJP) उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजपचे आतोनात प्रयत्न सुरू आहेत.
भाजपनं कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट(Girish Bapat) यांनाही मैदानात आणलं होतं. यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणाही साधला.
त्यातच चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी कसब्यातील प्रचारसभेत बोलताना महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना प्रचाराला घेऊन येतील. शेवटच्या दोन दिवसांत ते गांधींना स्वर्गातून घेऊन येतील.
आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला काॅंग्रेसनेते अतुल लोंढे यांनी उत्तर दिलं आहे. लोंढे म्हणाले की, याचा अर्थ असा होतो की यांना महात्मा गांधींची भिती 1925 पासून वाटते आणि आजही वाटत आहे.
गांधींच्या विचारांवर चालणारी काॅंग्रेस यांच्या हुकूमशाहीला आणि मनुस्मृतीला अडचण ठरत आहे, असं म्हणत लोंढेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या-