”आदिल मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो”

मुंबई | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतनं तिच्या पतीवर आदिल खानवर(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरेटीयलचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. यानंतर अंधेरी न्यायालयानं आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळं आदिल सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत.

आदिल राखीकडून घटस्फोट (Divorce) घेणार आहे मात्र राखी त्याला घटस्फोट देणार नाही असं म्हणाली आहे. आदिलच्या बाबतीत रोज नवीन खुलासे करणारे व्हिडीओ समोर येत आहेत. नुकताच पुन्हा एक व्हिडीओ राखीनं शेअर केला आहे. त्या व्हिडीओत तिनं थेट पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

आदिल मुस्लीम (Muslim) आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो असं त्याला वाटत असेल मात्र तिहेरी कायद्यामुळं तो हे करु शकत नाही. आदिलने माझ्याशी निकाह केला नसता तरी तो मला घटस्फोट देऊ शकत नाही. मुस्लिम कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. असं राखीनं म्हणलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिहेरी तलाक रद्द केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. जुग जुग जिओ मोदीजी. सगळ्या मुस्लीम महिलांचा तुम्हाला सलाम. अशा शब्दात राखीनं मोदींचे आभार मानले. या कायद्याची गरज मला कधी लागेल याचा मी विचार केला नव्हता. त्यामुळं मला घटस्फोट न देणं, हे आदिलच्या हिताचं आहे असंही राखी पुढे म्हणाली.

दरम्यान, 2022 मध्ये राखीनं आदिलसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. हे कोर्टमॅरेज (Courtmarriage) तिनं गुपचूप उरकलं होतं. या लग्नाचे फोटो मिडीयासमोर आल्यानंतर याचा खुलासा राखीनं केला होता. आदिलशी तिनं कोर्टमॅरेज आणि निकाह केल्याचं कबूल केलं. लग्नानंतर राखीनं तिचं नावदेखील बदललं होतं.

महत्त्वाच्या बातम्या