पठाण आज पाहता येणार अत्यंत कमी किंमतीत; तिकीटाची किंमत ऐकून व्हाल खुश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची जोरदार चर्चा होत आहे.

पठाणनं कमाईच्या बाबतीत आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत. पठाणनं आतापर्यंत 500 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळंच पठाणला मिळालेले यश लक्षात घेता अजून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा पठाणच्या मेकर्सचा प्रयत्न आहे.

पठाणच्या मेकर्सनं शुक्रवारी म्हणजेच 17 तारखेला ‘पठाण डे’ जाहीर केला आहे. यानिमित्तानं शुक्रवारी पठाण केवळ 110 रूपयांत पाहता येणार आहे. त्यामुळं ज्यांनी अजून पठाण पाहिला नाही त्यांच्यासाठी पठाण पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे.

पठाण हा चित्रपट शाहरूख आणि दीपिकाच्या करिअरमधील एक महत्त्वाचा आणि ब्लाॅकबस्टर सिनेमा ठरला आहे. त्यामुळं पठाणचे यश पाहता शाहरूखनं देखील काही दिवसांपूर्वी प्रेस काॅन्फरन्सदेखील घेतली होती.

दरम्यान, या चित्रपटाला सुरूवातीला झालेला विरोध पाहून हा चित्रपट बाॅक्स ऑफीसवर कमाल दाखवू शकणार नाही, अशा चर्चा होत्या. परंतु आता पठाण पाहण्यासाठी थिएटर्स हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-