कॉफीमुळे सेक्स लाईफमध्ये होऊ शकतो ‘हा’ मोठा बदल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | काॅफी (Coffee) हे एक उत्तेजक पेय आहे. अनेकदा कामाच्या ठिकाणी थकवा घालवण्यासाठी काॅफी पिली जाते. काॅफीचे काही फायदे तोटेदेखील आहेत. काॅफी आपल्याला काम करण्यासाठी उर्जाप्रदान करते. हीच काॅफी आपल्याला आपलं सेक्स लाईफ किंवा सेक्शुअल हेल्थसाठी मदत करते.

रात्री किंवा सेक्सपूर्वी काॅफीचे सेवन केल्यास सेक्स ड्राईव्ह (sex drive) वाढते, असा अभ्यास नुकताच एका संशोधनातून करण्यात आला आहे. काॅफी इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) मध्ये मदत करु शकते.अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, जे पुरुष दररोज 85 ते 170 मिलीग्राम कॅफिनचं सेवन करतात त्यांना चांगले परिणाम जाणवले आहेत.

काॅफीचं सेवन करणाऱ्या पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचे अर्थात नपुसंकतचा परिणाम जाणवण्याची शक्यता 42 टक्क्यांनी कमी होते. काॅफींमुळं महिलांची कामवासना (libido) वाढते. स्त्रीयांच्या शरीरात रक्त प्रवाह वाढवून सेक्स ड्राइव्ह वाढवतं. ज्या स्त्रिया आठवड्यातून एकदा काॅफी पितात त्यांची सेक्स ड्राईव्ह मजबूत असते.

स्त्री आणि पुरुष दोघांसाठी काॅफी कामोत्तेजक (aphrodisiac) म्हणूम काम करते. काॅफीत आढळणाऱ्या सुगंधामुळं पुरुषांचा ताण तणाव कमी होण्यास मदत होते. काॅफीच्या सुगंधामुळं मूड फ्रेश होतो. काॅफिच्या सेवनामुळे पुरुषांची देखील कामवासना वाढते. यामुळे तुमचे शारीरिकसंबंध चांगले होण्यास मदत होते

महत्त्वाच्या बातम्या