वाद आणखी वाढला; नाना पटोलेंचं राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या महाविकासाआघाडीत काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून सुरु झाला आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेचा वाद झाल्याचं पहायला मिळत आहे.

नाना पटोलेनीं विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसतं, अस वक्तव्य खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं होतं. त्याच्या या वक्तव्याचा नाना पटोलेनीं अगदी शांतपणे समाचार घेतला. माझ्या राजीनाम्यामुळं सरकार कोसळलं नसतं तर तुमचं नेतृत्व कमी पडत होतं, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा सवाल पटोलेंनी राऊतांना केला आहे.

मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचं आभार पटोलेंनी मानलं आहे. मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं असं वक्तव्य राउतांनी केलं आहे. यामुळे माझ्या शक्तीचा त्यांनी जगाला परियच करुन दिला आहे. असंही ते पुढं म्हणाले. ज्या पक्षाचा जे कोणी खुर्चीवर बसलं होत तो पक्ष कमजोर होता का? असं राऊतांना म्हणायचं आहे का? असा सवाल करत नानांनी (Nana Patole) राऊतांना चिमटा काढला.

दरम्यान पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला हेदेखील स्पष्ट केलं. मला विधानसभा पद देण्याचा आणि त्याच अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचाच होता. पक्षाचा आदेश पाळणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम होतं. त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही असं स्पष्टीकरण पटोलेंनी दिलं.

महत्त्वाच्या बातम्या