बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईने ग्रासलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार!

मुंबई | महागाईने ग्रासलेल्या जनतेला येत्या काळात महावितरणाकडून शॉक बसण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यात महावितरणाच्या वीज खरेदी खर्चात 13 टक्के वाढ झाल्याने वीजदर वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतीये.

एप्रिल आणि मे महिन्यात वीज खरेदी खर्च 27 टक्क्यांपर्यंत वाढला होता. महावितरणाला  एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 दरम्यान वीज खरेदीसाठी 30 हजार 746 कोटी मान्यता वीज नियामक आयोगाने दिली होती. पण प्रत्यक्षात मात्र कंपनीला 34 हजार 806 कोटींचा खर्च आला आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांसमोर वीजदरवाढीचे संकट उभारलं आहे.

जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणाने 25 पैसे प्रति युनिट दरवाढ केली होती. आता पुन्हा वीजदरवाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

Monsoon Assembly 2022 | अजित पवारांनी प्रश्न विचारताच तानाजी सावंत गडबडले, वाचा नेमकं काय घडलं?

ATM News: पैसे काढणाऱ्यांना झटका, इतके रूपये मोजावे लागणार

‘ईडी सरकार हाय हाय’; अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक

‘मला कुणाच्या क्लिन चीटची गरज नाही’; बच्चू कडू आक्रमक

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More