अखेर अंबानी कुटुंबाला मिळाल्या धाकट्या सुनबाई

मुंबई | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींची(Mukesh Ambani) ओळख आहे. अंबानी कुटुंबाविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. त्यातच गुरूवारी अंबानीच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडल्यानं अंबानी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा(Anant Ambani) साखरपुडा राधिका मर्चंट हिच्याशी झाला आहे. श्रीनाथ मंदिरात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बाॅलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.

राधिका आणि अनंत लहानपणापासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघंही एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळं त्यांचं लव्ह मॅरेज आहे, असं म्हणायला हरकत नाही.

राधिका ही विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकानं पूर्वी एका मोठ्या टीममध्ये सेल्स एक्झुकेटीव्ह म्हणून काम केलं आहे. तिला वाचन करण्याचीही प्रचंड आवड आहे. तसेच तिला ट्रेकिंग आणि स्विमिंगचीही आवड आहे.

राधिका भरतनाट्यम या नृत्यप्रकारात अग्रेसर आहे. दरम्यान नीता अंबानीही(Nita Ambani) भरतनाट्यंमध्ये अग्रेसर आहे.

महत्वाच्या बातम्या-