अत्यंत धक्कादायक! ‘या’ भारतीय कंपनीचं कफ सिरप घेतल्यानं 18 बालकांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | भारतीय फार्मा कपंनीनं बनवलेले कफ सिरप(Cough Syrup) घेतल्यानं तब्बल 18 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना उझबेकिस्तानात घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडं हळहळ व्यक्त केली जात आहे.

उझबेकिस्तान सरकारनं या कंपनीविरूद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी अनेकजण करत आहेत.

Dok1 Max हे कफ सिरप 2012 मध्ये उझबेकिस्तानच्या बाजारात आणलं गेलं होतं. हे औषध पालकांनी डाॅक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय मुलांना दिलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे हे कफ सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाही. आता या घडलेल्या प्रकारावर भाजप आणि काॅंग्रेसनंही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनही या घडलेल्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-