पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी(Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हीराबेन मोदी 100 वर्षांच्या होत्या. जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मातोश्रींचा 100 वा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्तानं मोदींनी आईचे पाय धुवून आशिर्वाद घेतला होता.

गुजरात विधासभा निवडणुकीच्या वेळीही मोदी जेव्हा मतदान करायला आले होते. तेव्हा त्यांनी मातोश्रींची भेट घेतली होती. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

मोदींनी मातोश्रींच्या निधनाची माहिती देणारं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मोदींनी मातोश्रींनी त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सांगतिलेली एक खास गोष्ट सांगितली आहे.

मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मी जेव्हा आईला तिच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेटलो होतो, तेव्हा आईने एक गोष्ट सांगतिलं होतं ते नेहमीच लक्षात राहील, ती गोष्ट अशी की, काम नेहमी बुद्धीनं केलं पाहीजे आणि जीनव नेहमी शुद्धीनं जगलं पाहीजे.

महत्वाच्या बातम्या-