सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये (DA Hike) चार टक्क्यांची वाढ केली.

जे कर्मचारी पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार घेत आहेत अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला असून तो कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

जे कर्मचारी सातवा वेतन आयोगाच्या कक्षेमध्ये येतात त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने चार टक्क्यांची वाढ केली व तो 46% इतका करण्यात आला.

जे कर्मचारी सहाव्या वेतन आयोगाच्या कक्षेत येतात अशा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांकरिता मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता आता 231 टक्क्यांवरून 230% करण्यात आला असून त्यामध्ये नऊ टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.

वाढ 1 जुलै 2023 पासून लागू

पुढील महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 मध्ये केली जाईल व त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ होईल अशी देखील एक शक्यता आहे. महागाई भत्त्यातील ही सुधारित वाढ ही एक जुलै 2023 पासून लागू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क मोठ्या संकटात?