‘त्या’ तरूणासाठी मोहम्मद शमी ठरला देवदूत, वाचवला जीव, पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | मोहम्मद शमीने (Mohammad Shami) एका तरूणाचा जीव वाचवला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नैनितालमधील रस्ता अपघातात (Road Accident) जखमी झालेल्या तरूणाचे प्राण वाचवले आहेत. शमीने या अपघाताचा व्हिडीओ शेअर करताना याबाबत माहिती दिली.

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना शमीने लिहिलं की, तो खूप भाग्यवान आहे की देवाने त्याला दुसरं आयुष्य दिलं आहे. विश्वचषक संपल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज रजेवर गेले आहेत.

सध्या मोहम्मद शमी उत्तराखंडमध्ये आहे. नैनितालला जाताना शमीने रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. शमीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करताना दिसत आहे, ज्याची कार रस्त्यावरून घसरली होती.

पाहा व्हिडीओ-

शमीची एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी

शमी हा एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने केवळ सात सामन्यांत 24 विकेट घेतल्या. शमी साखळी टप्प्यातील भारताच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. मात्र बांगलादेशविरुद्ध अष्टपैलू हार्दिक पांड्या जखमी झाल्याने शमीला संघात स्थान मिळालं.

शमीने अनेक रेकॉर्ड मोडले

शमीने विश्वचषकात आपली कामगिरी कायम ठेवली आणि अनेक विक्रम मोडले. त्याने अंतिम फेरीत डेव्हिड वॉर्नरची एकमेव विकेट घेतली. मात्र शमी सहाव्यांदा ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन होण्यापासून रोखू शकला नाही.

19 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करून विक्रमी सहाव्या वनडे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावलं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जातीयवादी पिलावळ आरक्षण…’; पडळकरांची जरांगेंवर टीका

Gold Rate | सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा आजचे दर

अभिनेत्री Aishwarya Rai ने केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Maharashtra Weather Update | राज्यातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क मोठ्या संकटात?