तुमचं पण ‘हे’ ब्लड ग्रुप असेल तर सावधान, येऊ शकतो हार्ट अटॅक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | धकाधकीचं आयुष्य, सातत्यानं बदलणारी जीवनशैली अनेक आजारांना हाताने दिलेलं निमंत्रण ठरत आहेत. अगदी कमी वयापासून अनेकांना डायबिडीज (Diabetes), ब्लड प्रेशर (Blood Pressure), कोलेस्ट्रॉल (Cholesterol) यासारख्या आजारांना तोंड द्यावं लागत आहे.

गेल्या काही काळापासून हार्ट अटॅकच्या (Heart Attack) प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. त्यात अगदी कमी वयाच्या लोकांना पण हार्ट अटॅक येत असल्याने हा एक गंभीर विषय बनला आहे.

हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होत असताना याबद्दलची एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. एका विशिष्ट प्रकारचं ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तिंना हार्ट अटॅकचा धोका सगळ्यात जास्त असल्याचं आता संशोधनातून समोर आलं आहे.

ब्लड ग्रुपची योग्य माहिती असेल तर आपल्याला ह्रदयाशी संबंधित आजार आणि त्याच्या धोक्याचा अंदाज लावता येऊ शकतो. हेल्थ रिसर्चर्सच्या रिपोर्टमधून याबबतची माहिती आधीच समोर आली होती.

ओ ब्लड ग्रुप (O Blood Group) असलेल्या लोकांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस, हाइपरलिपिडिमिया आणि हार्ट फेल होण्याचा धोका हा ए ब्लड ग्रुप (A Blood Group) असलेल्या लोकांच्या तुलनेत कमी असतो. तर 2020 मध्ये अमेरिकन हार्ट एसोसिएशन जर्नलमध्ये पब्लिशच्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, ज्या लोकांचं ब्लड ग्रुप हे बी ब्लड ग्रुप (B Blood Group) आहे त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो.

दरम्यान, ओ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये कालांतराने ब्लड प्रेशरचा धोका पण वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या ब्लड ग्रुप नुसार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती काळजी घ्या.

महत्त्वाच्या बातम्या-