सरपंचपदाच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांच्या मातोश्रींचा विजय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सांगली | भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. पडळकरवाडी ग्रामपंचायतवर गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता आली आहे.

आटपाडी येथील पडळकरवाडी ग्रामपंचायतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होत्याय या निवडणुकीत हिराबाई कुंडलिक पडळकर या विजयी झाल्या आहेत.

सरपंच पदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या तीनशे मतांनी निवडून आल्या आहेत. आणि पडळकरवाडी ग्रामपंचायतवरही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली आहे. निवडणुकीत 7 सदस्य हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत.

सुरूवातीला या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र पडळकरांचे विरोधक तानाजी पाटील यांनी आपला उमेदवार दिला. मात्र या ठिकाणी पडळकरांची एकहाती सत्ता आली.

दरम्यान, गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. तसेच त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर यांना विराजमान झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-