मुंबई | आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. आरक्षणाच्या ( Maratha reservation) मागणीने संपुर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचा आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. राज्यातील राजकीय नेतेही या लढ्यात सहभागी झाले आहेत. ते ही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास ( Ramdas athavale) आठवले यांनी आरक्षणाबाबत मोठा दावा केला आहे.
रामदास आठवले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadnavis ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे प्रयत्न करत आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे यासाठी सगळ्यात पहील्यांदा मी आणि माझ्या पक्षाने मागणी केली होती, असा दावा त्यांनी केला.
पहिली आंदोलनं अशी झाली नव्हती. 8 लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना आरक्षण मिळावं अशी जरांगे पाटलांची ( Manoj jarange patil ) मागणी आहे. आताची आंदोलनं तीव्र आहेत. त्यामुळे सरकार आरक्षण देईल. परंतू जरांगे पाटलांचा जिव वाचला पाहिजे. आधिवेशन बोलवण्याची अनेकांची मागणी आहे. दोन दिवसांचे आधिवेशन बोलवून आरक्षणावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोणालाही आडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे. ओबीसी प्रवर्गात कोणत्या जातींना टाकायचे याबाबतचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाला दिल्यास आम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न करु. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्याच्या सुचना माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा
‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण
मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली
पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती