सोलापूर | मराठा आरक्षणावर राज्यात वादळ पेटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर जर मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मी पुन्हा एकदा जलत्याग करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात गेले काही दिवस आरक्षणामुळे काही भागात जमावबंदी करण्यात आली आहे. बीड येथे काही राजकीय नेत्यांच्या घरावर दगडफेक करत गाड्या जाळल्या आहेत. तर राजकीय नेत्यांना काही गावात नो एन्ट्री आहे. याच पार्श्वभूमी आता आणखी एका आमदाराची गावकऱ्यांनी गाडी अडवली आहे.
कोणत्या आमदाराची गाडी अडवली?
सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी अडवण्यात आली आहे. मराठा कार्यकर्ते पंढरपुरात चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी आज सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची गाडी अडवली. पंढरपूरच्या कराड नाक्यावर मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली.
शहाजी बापूंच्या गाडीच्या वाहनचालकाने अंगावर गाडी घातल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलक शहाजी बापू यांच्या वाहन चालकावर प्रचंड संतापले. त्यांनी वाहन चालकाला शिवीगाळ देखील केली.
आक्रमक झालेल्या मराठा बांधवाना समजवण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी समस्त गावकऱ्यांची हात जोडून माफी मागितली. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न देखील केली. यावेळी आंदोलकांनी शहाजी बापू यांना जाब विचारला. तुम्हाला गावबंदी असताना तुम्ही इथे का आलात?, असा सवाल आंदोलकांनी केला.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; उद्धव ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल
‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा
‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण
मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली