सुप्रिया सुळे आक्रमक; मुख्यमंत्र्याकडे केली ‘ही’ मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणाचा लढा जास्तच तीव्र झाला आहे. आरक्षणासाठी मराठा समाजासोबतच आमदार आणि खासदारही आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसात आमदार आणि खासदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं.

विधानसभेचे विशेष आधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी केली. या आंदोलनात सुप्रिया (Supriya sule) सुळेही सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis ) यांना लक्ष्य केलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

मुख्यमंत्र्याने त्यांच्या गृहमंत्र्याचा तातडीने राजीनामा घ्यावा. हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे. धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, हे सगळं राज्य सकारचं अपयश आहे. त्यातही गृहमंत्र्याचं जास्त अपयश आहे. त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्याने तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

या दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं. त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केल्या. मराठा आरक्षणासाठी तातडीने विधानसभेचे एकदिवसीय आधिवेशन घ्या, अशी मागणी आमदारांनी केली आहे.

या आंदोलनात सुप्रिया सुळे यांच्यासह जयंत पाटील, (Jayant patil) जितेंद्र आव्हाड,  (Jitendra avhad) रोहीत पवार, (Rohit pawar) नरेंद्र दराडे, शिशिकांत शिंदे, विलास पोतनीस आणि प्रकाश फातर्पेकर हे आमदार विधान भवानाच्या पायऱ्यांवर बसून होते.

या दरम्यानच मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकले. त्यांनीही मराठा आरक्षणासाठी तात्काळ विधानसभेचे एकदिवसीय आधिवेशन बोलवण्याची मागणी केली. जोपर्यंत आधिवेशन बोलवलं जात नाही, तोपर्यंत मंत्र्यांना मंत्रालयात प्रवेश देणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यांना लगेच पोलिसांनी ताब्यात घेतलं.

महात्त्वाच्या बातम्या – 

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली

पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला