रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आक्रमक झाले आहेत. कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत.

पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल, असं रवींद्र धंगेकर म्हणालेत.

निवडणूक निर्णायक अधिकारी, प्रचार प्रमुखांकडे तक्रार केली. पण त्या तक्रारींची दखल यंत्रणा घेत नाहीयेत. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी नियमांचा भंग केलाय म्हणून आम्ही उपोषणाला बसणार आहेत, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी मांडली.

पुण्यातील पैसे वाटपात पोलिसांवर दबाव येत आहे. सामान्य कुटुंबातील उमेदवार विजयी होणार, असं दिसत असताना भाजपने पैसे वाटप सुरु केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतोय.

महत्त्वाच्या बातम्या-