“संजय राऊतांचं आडनाव बदलून आगलावे करा”

मुंबई | श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली, असा आरोप खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. आता यावर प्रतिक्रिया देत मंत्री शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगलं काम करणारं तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदेंचं आहे. अशा तरुण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. पण बेभान झालेले संजय रऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही, असं ते म्हणालेत.

खरं तर, या संजय राऊतांचं आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असं त्यांचं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत, असं ते म्हणालेत.

शहाजीबापू पाटलांच्या टीकेबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, हा कोण शहाजी? हा खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय.

महत्त्वाच्या बातम्या-