Sanam Puri | गायक सनम पुरी अडकला लग्नबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanam Puri | प्रसिद्ध गायक सनम पुरीने नागालँडमध्ये गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. सनमने गर्लफ्रेंड झुचोबेनी तुंगोई हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. सनमची पत्नी झुचोबेनी तुंगोई (Zuchobeni Tungoe) ही त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर, सनम (Sanam Puri) 31 वर्षांचा आहे. तरुणाईवर आपल्या आवाजाने जादू करणाऱ्या सनमने गुपितपणे नागालँडमध्ये लग्न उरकून घेतले.

सनमच्या (Sanam Puri) फॅन पेजवरून त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने लग्न केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत. झुचोबेनीने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. तर सनमने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

नागा पद्धतीने झाल्या लग्नाच्या विधी

सनम पुरीची (Sanam Puri) पत्नी झुचोबेनी तुंगोई ही मुळची नागालँडची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या लग्नाचा खुलासा केला होता. आम्ही पंजाबी आणि लोथा नागा पद्धतींनुसार लग्न करणार असल्याचे तिने सांगितलं होतं. झुचोबेनी ही सनमच्या
बँडचाच एक भाग आहे. ते दोघेही सोबत गाणी गातात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juhi (@sanam_juhi)

दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करणं हा अत्यंत आनंदी अनुभव असल्याचं सांगितलं. या लग्नात फक्त जवळचे मित्र आणि परिवार यांचीच उपस्थिती होती. सनमच्या कुटुंबाला नागा संस्कृती बघायची होती. त्यामुळे त्यांनी नागा पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी नागा पद्धतीने सर्व विधी केल्या.

सनमला चाहत्यांच्या शुभेच्छा |

सनमने (Sanam Puri) त्याच्या लग्नानंतर एक गाणेही रिलीज केले, ज्यामध्ये त्याची पत्नी आणि त्याने सोबत गायन केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या गाण्याची निर्मिती केली होती. आपल्या लग्नाच्या स्पेशल दिवशी त्यांनी ते रिलीज केले. दोघांवरही आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

सनम पुरी हा जुनी गाणी आपल्या आवाजात रेकॉर्ड करत असतो. त्याच्या आवाजातील या गाण्यांना प्रचंड लाइक केले जाते. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तो ‘धत तेरी की’, ‘इश्क बुलावा’ यासारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या ‘सनम’ नावाच्या पॉप-रॉक बँडचा तो मुख्य गायक आहे. याच पॉप-रॉक बँड अंतर्गत त्याने बऱ्याच गाण्यांची निर्मिती केली आहे.

News Title- Sanam Puri wedding

महत्त्वाच्या बातम्या- 

Sharad Mohol | ‘तो’ प्लॅन फेल गेला अन्…; शरद मोहोळ हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

Mahalakshmi | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं वादळ, पती ICU मध्ये दाखल

Neetu Kapoor | आलियाच्या आईमुळे कपूर कुटुंबात वाद?, नीतू कपूर यांनी केला खुलासा

Travel | फक्त Lakshadweep नाही, भारतातील ‘या’ अतिसुंदर भागांमध्ये सुद्धा विनापरवाना मिळत नाही प्रवेश!

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार