Instant coffee | तुम्ही पण इन्स्टंट कॉफीचे शौकीन आहात?, आताच व्हा सावध अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Instant coffee | एआयच्या या जमान्यात सर्वांनाच सगळं काही त्वरित हवं असतं. एखादी गोष्ट आपल्याकडे लगेच यायला हवी किंवा ही गोष्ट आपल्याला लगेच मिळायला हवी असा अट्टहास आताच्या पिढीमध्ये दिसून येतो. मग या धावपळीच्या जगात खाण्या-पिण्याच्या बाबतीतही असंच घडतं. आता तर इन्स्टंट फूड आणि इन्स्टंट कॉफीचा (Instant coffee) एक ट्रेंडच सेट झाला आहे.

त्यातच बऱ्याच जणांना इन्स्टंट कॉफीचाही (Instant coffee) प्रचंड शौक असतो. मात्र, हीच इस्टंट लाईफस्टाइल आरोग्यासाठी किती धोक्याची ठरू शकते, याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. इन्स्टंट कॉफी पिणाऱ्यांची संख्या जरा अधिकच दिसून येते. मात्र, हीच इन्स्टंट कॉफी हृदयासंबंधी अनेक समस्या निर्माण करू शकते. आज याबद्दलच अधिक जाणून घेऊयात.

इन्स्टंट कॉफी म्हणजे काय?

तरुण पिढीला इन्स्टंट कॉफीचे (Instant coffee) अधिकच आकर्षण असल्याचे दिसून येते. ही इस्टंट कॉफी बनवायला फार सोपी असली तरी ती आरोग्यालाही सहज बिघडवू शकते. इन्स्टंट कॉफीच्या पाउचमध्ये कॉफी पावडर असते. ज्यामध्ये दूध आणि साखर मिसळली जाते. ही पावडर फक्त गरम पाण्यात मिसळावी लागते. गरम पाणी मिसळले की, क्षणात तुमची कॉफी तयार होते. त्यामुळे ही कॉफी बनवणे फार सोपी ठरते.

एका वेळेला ही कॉफी पिणे ठीक आहे. मात्र याचं अति सेवन शरीरास अत्यंत घातक ठरू शकते. कॉफी अधिक पिल्याने डिप्रेशन तसेच मधुमेह सारखी समस्या उद्भवू शकते. यासोबतच हृदयासंबंधीही आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉफीचे अधिकचे सेवन टाळणे कधीही फायद्याचे आहे.

इन्स्टंट कॉफीमध्ये (Instant coffee) फॅटचे प्रमाण अधिक असते. यातील फॅटमुळे लगेच वजन वाढते. वजन वाढले की, रक्तातील साखरेची पातळीही वाढू लागते. यामुळे टाइप 2 चा मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. तसेच काही व्यक्तींना दुधाची ऍलर्जी असते. अशा व्यक्तींनी तर ही इन्स्टंट कॉफी अजिबात पिऊ नये. त्यांना याचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो.

कॉफीऐवजी ‘या’ आरोग्यदायी पेयांना प्राधान्य द्या

इन्स्टंट कॉफीऐवजी (Instant coffee) हर्बल टी हा सर्वांत चांगला मार्ग आहे. या सोबतच पेपरमिंट चहा किंवा आल्याचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातही अँटीऑक्सिडंट्सने भरपूर अशी ग्रीन टी देखील आरोग्यासाठी चांगली असते. यासोबतच, हळद आणि दूध देखील पिणे कधीही फायद्याचे आहे.

कुणाला दूध नसेल आवडत तर त्यांनी फळांचा रस घ्यावा. फळांचा रस आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात. फळांचे रस शरीराला ऊर्जा देखील देतात. त्यामुळे कॉफी किंवा चहा ऐवजी फळांचा रस हा चांगला पर्याय ठरू शकतो.

News Title- Instant coffee Side effects

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट