“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल”

मुंबई | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेवर घटनाबाह्य सरकार असल्याचं म्हणत जोरदार टीका केली होती. यावरून शिवसेनेच्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी ठाकरे यांना प्रतिउत्तर दिल.

तुम्हाला कुणाकडून खोके मिळाले. किती खोक म्हणाले. कधी मिळाले आणि कोणत्या गाडीतून खोके मिळाले सांगितलं तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल, असं शीतल म्हात्रे म्हणालेत.

तुम्ही जनसंवाद यात्रा किंवा इतर कार्यक्रम करता तेव्हा त्यासाठी पैसे लागतात. हे पैसे कुठून येतात?, हेही लोकांना समजायला हवं. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना सांभाळून बोला, असं शीतल म्हात्रे म्हणाल्यात.

दरम्यान, आपण ज्यांच्याबद्दल बोलता आहात ही व्यक्ती कोण आहे? याने पक्षासाठी काय काय केलेलं आहे? शिवसेना वाढवण्यासाठी काय काय कष्ट घेतलेले आहेत? याची माहिती करून घ्या. आपल्या पिताश्रींना हे माहिती नसेलच. तेव्हा जे जुने शिवसैनिक आहेत त्यांना विचारा. की ही जी सर्व मंडळी आहेत यांनी शिवसेना वाढवण्यासाठी काय केलंय? आणि आपल्या पिताश्रीने याच शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पायाशी नेऊन ठेवलेलं आहे. ही शिवसेना ही वाचवण्यासाठी हे घेतलेली ही पावलं आहेत, असा पलटवार शीतल म्हात्रे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More