हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर दोघांच्या अडचणी वाढल्या!

पुणे | भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तसेच राष्ट्रावादी काँग्रेसच्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेमंत रासणे मतदानाला आले तेव्हा त्यांनी गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. रासने यांना हा प्रकार चांगलाच भोवला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आरोप करीत उपोषण केलं.

भाजपने (Bjp) मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.  तर  रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी कसब्यातील आमदारकीसाठीची ही पोट निवडणूक (Election) पार पडली. भाजप, काँग्रेस या दोन प्रमुख उमेदवारांसह इतर 16 उमेदवारांनी या निवडणुकीत नशीब आजमावलं आहे. निवडणुकीत काल 50.06 टक्के मतदान झालं. 

महत्त्वाच्या बातम्या-