मुंबई | मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधार यांच्यावर टीका करताना शिवसेनेतील जुन्या माणसांवर कसा अन्याय झाला हे सांगितलं.
ज्या शिवसेनेसाठी प्रबोधन यात्रा काढण्यात आली त्या यात्रेत सुषमा अंधारे यांच्याकडून भाषण देण्यात येऊ लागले. मात्र सुषमा अंधारे जशी शिवसेनेत आली, तसं शिवसेनेच्या उजेडातल्या बायका अंधारात गेल्या, असं प्रकाश महाजन म्हणालेत.
अंधारेंनी संत ज्ञानेश्वर यांच्यावरही टीका केली होती. टीका करताना त्यांनी ज्या ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून शब्द वधवून घेतले होते, त्या रेड्याबद्दल बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असले तर आम्ही काय करणार असं म्हणत असाताना त्यांनी त्यांचा उल्लेख म्हैस असा केला आहे.
अंधारेंवर बोलताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरल्याने आता येत्या काही दिवसात प्रकाश महाजन आणि सुषमा अंधारे यांचा वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.
दरम्यान, ज्या 85 वर्षांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी कोणत्याही मर्यादा पाळल्या नव्हत्या, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
- कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात; मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?
- “विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”
- “अजित पवार माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन”
- मोठी बातमी! सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार?
- गोल्डमॅन दत्ता फुगे प्रकरण; सात वर्षांनंतरही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही