महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, असा महाराष्ट्र कधीही नव्हता- राज ठाकरे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. मी बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करायला विधानभवनात गेलो होतो. त्यावेळी खाली बसलेले अनेकजण होते. त्यावेळी मला कळत नव्हते की कोण कोणत्या पक्षातील आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं. ते मुंबईत एका मुलाखतीत बोलत होते.

‘ठाकरे नेमकं काय वाचतात’ या विषयावर राज ठाकरेंची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.

आत्ताची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहता मतदारांना काही किंमत आहे असं मला काही वाटतच नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही आमचं काय नाचायचं ते नाचू, असं ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मी झेपेल तेवढेच वाचतो. मला एखादी गोष्ट आवडली तर मी परत परत वाचतो. काय बोललो यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला काही द्यायचे असेल तर वाचले पाहिजे, पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-