श्रेया बुगडेनं नवऱ्यासाठी केलेल्या ‘त्या’ खास पोस्टची होतेय जोरदार चर्चा

मुंबई | ‘चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाद्वारे श्रेया बुगडे(Shreya Bugade) घराघरात पोहचली. आपल्या अभिनयाद्वारे तिनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि अजून हसवत आहे.

मंगळवारी श्रेयाच्या लग्नाचा आठवा वाढदिवस आहे. यानिमित्तान तिनं नवऱ्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

श्रेयानं इंस्टाग्रामवर दोघांचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला तिनं कॅप्शन दिलं आहे की, मी सदैव तुझ्या सलूनच्या अपाॅइंट्समेंट बुक करेन. आपण ठरवतो की एकत्र चित्रपट पाहायचा आणि त्याच्या तिसऱ्या मिनिटाला आपण झोपून जातो.

मला किंवा तुला कितीही उशीर झाला असला तरी तुझे कामाच्या ठिकाणी घालायचे कपडे मीच सिलेक्ट करेन. किमान सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण तुला माझ्या हातचे खाऊ घालेन, असंही तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कायम तुझी सुर्यास्त होतानाची बीच पार्टनर बनेन, असं म्हणत तिनं नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, श्रेयाचे इंस्टाग्रामवर नऊ लाखांपेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत. श्रेयाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते कमेंट्सच्या माध्यमातून दोघांना शुभेच्छा देत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More