सावधान! …तर तुमचाही काॅल रेकाॅर्ड होत आहे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बऱ्याचदा महत्वाच्या गोष्टी आपण फोनवर बोलत असतो. परंतु अनेकांच्या मनात भीती असते की, आपला काॅल रेकाॅर्ड(Call Record) होईल. अशी भीती वाटणाऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. कारण फोन काॅल रेकाॅर्ड करणं बेकायदेशीर आहे.

समोरचा फोनवर बोलणारा व्यक्ती आपला काॅल रेकाॅर्ड करत आहे की नाही, हे जाणून घेणं सोप झालं आहे. त्यासाठी फक्त काही गोष्टी तुम्हाला फाॅलो कराव्या लागतील.

सध्या काही फोनमध्ये अशी सिस्टीम आहे की, जर तुमचा काॅल रेकाॅर्ड होत असेल तर तुम्हाला आपोआप काॅल रेकाॅर्ड होत असल्याची सूचना मिळते. परंतु फोनचे जे खूप जुने माॅडल आहेत त्यामध्ये काॅल रेकाॅर्ड होत असल्याची सूचना मिळत नाही.

तुम्हाला जर काॅल रेकाॅर्ड होत आहे की नाही हे तपासून पाहायचं असेल तर तुम्ही ते जाणून घेऊ शकता. जर तुम्ही फोनवर बोलत असताना बीप ऐवजी तुम्हाल लांब बीप ऐकू येत असेल तर तुमचा काॅल रेकाॅर्ड होत आहे, असं समजावं.

तसेच फोनवर बोलत असताना दुसऱ्या टोनचा आवाज येत असेल तरीही तुमचा काॅल रेकाॅर्ड होत आहे. त्यामुंळ जर तुमचा काॅल रेकाॅर्ड होऊ नये असं वाटत असेल तर या ट्रीक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

दरम्यान, अनेकांना असं वाटत असते की, काॅल रेकाॅर्डिंग करणं म्हणजेचं काॅल टॅप करणं. परंतु फोन टॅप(Phone Tapping) करणं ही संकल्पना वेगळी आहे. जेव्हा दोन व्यक्तींच बोलणं तिसरी व्यक्ती रेकाॅर्ड करत असते त्याला काॅल टॅप करणं म्हणतात.

महत्वाच्या बातम्या-