‘पायलटनं विमान ढगात घातलं अन्…’, शिंदेंनी सांगितलेल्या ‘त्या’ अनुभवाची होतेय जोरदार चर्चा

मुंबई| मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची(EKnath Shinde) भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच त्यांनी केलेल्या सभा, दौरे याचीही सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असते. अशातच आता शिंदेंनी विमानातील सांगितलेला थरारक अनुभव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

नुकताच शिंदेंनी एका मुलाखतीत त्यांच्यासोबत घडलेला अनुभव सांगितला. शिंदें एकदा बुलढाण्याला गेले असता तेथून परतत असतानाचा हा अनुभव आहे.

हा अनुभव सांगताना शिंदे म्हणाले, आम्ही सगळे विमानात होतो, तेव्हा पावसाचं वातावरण असताना, ढगाळ परिस्थिती असताना पायलटनं विमान ढगामध्ये घातलं. ते काय निळं,लाल, पिवळं ढग होतं, त्यामध्ये विमान दहा-दहा फूट आपटत होतं. त्यावेळी आमचा कार्यक्रम होणार होता, पण आम्ही सुखरूप घरी पोहचलो.

शिंदेंनी सांगितलेल्या या अनुभवाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या वरून काही नेटकरी शिंदेंची खिल्ली उडवत आहेत. काहीजण यावर मजेशीर कमेंट्सही करत आहेत.

दरम्यान, शिंदेंनी यापूर्वी सांगितलेला विमानातील किस्साही असाच व्हायरल झाला होता. त्यावेळी शिंदे म्हणाले होते की, त्यांना लिलावती रूग्णालयात फोन लावयचा होता, पण फोन लागत नव्हता. त्यावेळी त्यांनी पायलटला सांगितलं की, पाच-दहा मिनिटे विमान थांबव,मला महत्वाचा फोन लावायचा आहे. तेव्हा पायलटनं दहा मिनिटे विमान थांबवलं.

शिंदेंनी हा किस्सा सांगितलेल्यानंतरही शिंदेंची अशीच खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली होती. त्यावेळीही नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करत त्यांना धारेवर धरलं होतं.

महत्वाच्या बातम्या-