मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी युक्तिवाद करत ठाकरे गटाची जोरदार बाजू मांडली.
राज्यपालांनी विद्यमान सरकारला दिलेला शपथविधी चुकीचा ठरल्यास शिंदे-फडणवीस सरकार जाईल, असा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला.
शिंदे-फडणवीस यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. ठाकरे गटाकडे बहुमताचा आकडा आहे, असा दावाही कपिल सिब्बल यांनी केला.
सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. 39 जणांचं बहुमत तपासून आयोगानं त्यांना चिन्ह दिलं, कोर्टाच्या निर्णयाचा त्यांनी गैरवापर केला, असं सिब्बल म्हणालेत.
आम्ही या प्रकरणात आयोगाने काय निर्णय घेतला हे बघणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यावर ठाकरेंवर आयोग, राज्यपाल आणि त्यांच्या आमदारांनी सर्वांनी अन्याय केला आहे. आयोगाने निर्णय घेतल्याने त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह देखील नाही, असं सिब्बल म्हणाले.
दरम्यान, आमदार पात्र आहेत हे राज्यपालांनी गृहित धरलं. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. राज्यपालांकडे काय काय होतं ते मागवून घ्यायला हवं. कायद्याच्या माझ्या प्रस्तावाशी सहमत असाल तर राज्यपालांचा निर्णय रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-