‘मी ही केस जिंकेन किंवा हरेन पण…’; कपिल सिब्बल भावूक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis)  सुनावणी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. दोन दिवस युक्तीवाद केल्यानंतर दोन्ही पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने आपलं लेखी मत मांडण्याचे आदेश दिले होते.

आज सकाळपासून पुन्हा कोर्टासमोरील या खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. सुरुवातीलाच घटनापीठातील सदस्यांमध्ये राज्यपालांच्या अधिकारांवरून चर्चा झाली. त्यानंतर कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या आकड्यांवरून मोठं भाष्य केलंय. याआधी युक्तिवादाचा शेवटी सिब्बल भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मी हे प्रकरण जिंकेन किंवा हरेन, पण त्याकरिता मी इथे उभा नाही. मी इथे उभा आहे ते घटनात्मक नैतिकता टिकून राहावी म्हणून, जी आपण 1950 पासून देशात रुजवत आलो आहोत. मी यासाठी उभा आहे, असं ते म्हणालेत.

वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आपला युक्तिवाद मांडत असताना म्हणाले की, राज्यपाल हे स्वत:हून बहुमत चाचणीसाठी विनंती करु शकत नाहीत. एखादा गट राज्यपालांकडे जाणं गरजेचं असतं. त्यावेळेस राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे न्यायालयाची दिशाभूल करत आहे. राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव व बहुमत चाचणी यांची पत्र होती, अशी माहिती त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-