सरकारची भन्नाट योजना,व्याजाशिवाय घेता येणार कर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर रोजगार मिळणं कठीण होत चालले आहे. त्यामुळे आता अनेकजण स्वत:चा व्यवसाय करण्यावर भर देत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी मोठा (Money) पैसा गोळा करणं गरजेचं आहे.

त्यासाठी लागणारा पैसा बँकेतून (Bank) घेण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र बँकेचे व्याज, मुदत यासगळ्यामुळे बँकेतून कर्ज घेणं अवघड वाटू लागते. त्यामुळे मग अनेकदा व्यवसायाचे स्वप्न अर्धवट राहुन जातं.

केंद्र सरकार नवीन व्यवसायिकांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत असते. काही ठिकाणी कमी व्याजदर असतो. तर काही ठिकाणी मुदत देखील जास्त असते. मात्र केेंद्र सरकारची(Central Govt) एक योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला व्याजदर बसणार नाही.

या योजनेचं नाव पंतप्रधान स्वानिधी योजना (Pradhan Mantri Swanidhi Yojana) आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार तुम्हाला व्यवसायाला चालना देण्यास मदत करतं. या योजनेअंतर्गत सरकारकडून तुम्हाला 50 हजारांचे कर्ज बिनव्याजी मिळत आहे. केंद्र सरकारने ही योजना 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती. ही योजना आता 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठीचा अर्ज तुम्ही पीएम स्वानिधीच्या वेबसाइटवर ऑनलाइन देखील करु शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा एखादा लहान व्यवसाय असणं गरजेचं आहे. किराणा दुकान, रस्त्यावरील विक्रेते, सुतारकाम यासारखा उद्याेग करणारे या योजनेसाठी अर्ज करु शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणत्याही कागदपत्रांची (Documents) आवश्यकता नाही.

दरम्यान, या योजनेतून तुम्ही कर्ज घेतल्यास तुमचा फायदा होऊ शकते. या योजनेतील कर्जाची तुम्ही योग्य परतफेड केल्यास दुसऱ्यांदा या योजनेत तुम्हाला व्याजाशिवाय दुप्पट रक्कम मिळणार आहे. या योजनेअंतर्गत(Under the scheme) घेतलेल्या रकमेची परतफेड तुम्ही 1 वर्षात करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या