बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्याबरोबरीचा’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई |  दक्षिणेकडील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता नंदामुरी बालाकृष्ण यांना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नंदामुरी एका तेलुगू वृत्त वाहिनीच्या मुलाखतीवेळी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

फक्त ऑस्करच नाही तर मी भारताचा सर्वोच पुरस्कार, भारतरत्नही मानत नाही. माझा असा विश्वास आहे की, भारतरत्न प्रतिष्ठित पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामराव यांच्यासाठी योग्य नव्हता, असं नंदामुरी बालाकृष्ण यांनी म्हटलं आहे.

तेलुगू चित्रपट सृष्टीत माझ्या कुटुंबाच्या योगदानाची बरोबरी कोणताही पुरस्कार करु शकत नाही. मला वाटतं की भारतरत्न हा पुरस्कार एन. टी. आर यांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे. सर्व पुरस्कार म्हणजे माझ्या पायाच्या धुळी समान असल्याचं बालाकृष्ण म्हणाले.

दरम्यान, माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या वडिलांना नाही तर या पुरस्कारांना वाईट वाटले पाहिजे की ते आमच्याकडे नाहीत, असंही बालाकृष्ण यांनी म्हटलं आहे. नंदामुरी याआधीही चर्चेत आले होते. त्यांनी आपल्या चाहत्याच्या कानशिलात लगावली होती तेव्हा त्यांची चर्चा होती.

थोडक्यात बातम्या- 

मनसेच्या दहीहंडीला 100 टक्के नाचायला येणार – प्रविण तरडे

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत”

राज्यांना ‘इतक्या’ कोटी लसींचे डोस दिले; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

चीनमध्ये आढळला आणखी एक नवा व्हायरस; एका रूग्णाच्या मृत्यूने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More