Top News

अखेर मोदी सरकार नमलं; शेतकऱ्यांना दिली ‘ही’ परवानगी!

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकरी दिल्लीत गेले आहेत. मात्र त्यांना दिल्ली परवानगी दिली जात नव्हती. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलन कर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्लीच्या बुराडी स्थित निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांना मैदानातून बाहेर जाण्याची परवानगी नसल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करण्याची मागणी शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली होती. आंदोलनामध्ये जवळपास 5 लाख आंदोलनकर्त्यांचा यामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, दिल्लीमध्ये दाखल झाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला होता. कोरोनाच्या मार्गदर्शन तत्वांचं पालन करून  निरंकारी मैदानातही मास्कसह सोशल डिस्टन्सिंग करून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आजपासून नेटफ्लिक्सवर फुकट पाहता येणार वेबसीरिज; पाहा कसं कराल सुरु!

नशिबाने थट्टाच मांडली होती, मात्र शेवटच्या षटकांमध्ये जडेजा नावाचं वादळ आलं अन्…

शेतकरी आंदोलनावर अखेर सोनू सूदही बोलला पण जरा जपूनच!

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा!

4 वर्षात पहिल्यांदाच जिओला धोबीपछाड; ‘ही’ कंपनी बनली नंबर वन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या