बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं!’; जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा

मुंबई | भांडुप येथील ‘ड्रीम मॉल’मध्ये शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय होते.  या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. यातील एका जवानाचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर या जवानाचं कौतुक करण्यात येत आहे.

भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत होते. त्यावेळी त्या माॅलमध्ये पडलेला तिरंगा एका जवानाला दिसला. त्या तिरंग्याला आगीच्या विळख्यातून वाचवण्यासाठी त्याने तो तिरंगा हळूवार उचलून खाली आणला. या प्रसंगाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. नेटकरी या फोटोला सोशल मीडियावर भरपूर पसंती देत आहेत.

आगीच्या या तांडवात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. कोव्हिड रुग्णालयात फक्त व्हेंटीलेटरवर असणाऱ्या रूग्णांना लवकर हलवता आलं नाही. बाकी सर्व रूग्णांना वेळेवर बाहेर काढण्यात आलं होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

दरम्यान, महाराष्ट्रात आग लागण्याच्या घटनात वाढ होत आहे. पुण्याच्या फॅशन स्ट्रीटला आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तर पुण्यात शनिवारी 3 ठिकाणी आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ सुरूये, कोणाची एजंटगिरी करताय?”

सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण; नुकतीच खेळली होती वर्ल्ड सिरीज

टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट!

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण!

‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More