IMG 20171219 101142 - काकडेंच्या भाकिताची खिल्ली, पुण्यात झळकले पोस्टर्स
- पुणे, महाराष्ट्र

काकडेंच्या भाकिताची खिल्ली, पुण्यात झळकले पोस्टर्स

पुणे | गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही, असं भाकीत वर्तवणारे भाजप खासदार संजय काकडे यांची खिल्ली उडवण्यात आलीय. पुण्यातील सदाशिव पेठेत यासंदर्भात बॅनर झळकलेत.

“कावळा बसायला अन् फांदी तुटायला”, “Every day is not ‘काक’डे”, असे टोमणे या पोस्टर्सवर लिहिण्यात आलेत. पुण्यातील राजकीय वर्तुळात हे पोस्टर्स सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरलेत.

दरम्यान, हे पोस्टर्स कुणी लावले यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र भाजपअंतर्गत काकडे विरोधकींनीच हे पोस्टर लावले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा