मुंबई | भिवंडीतील काँग्रेसमधील 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. भिवंडी महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीपासून काँग्रसेच्या अंतर्गत वादाचा फटका बसला आहे.
या संबंधित नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून त्यांना काँग्रेस पक्षाने नोटीस पाठवली आहे. मात्र याच नगरसेवकांनी हात दाखवत पवारांच्या उपस्थितीत हाती बांधल घड्याळ बांधलं आहे.
काँग्रेसच्या या नगरसेवकांनी पक्षप्रवेशावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना पक्षप्रवेशासाठी नकार दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. @Jayant_R_Patil आणि उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/bsIpJ3uCel
— NCP (@NCPspeaks) December 23, 2020
थोडक्यात बातम्या-
“आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे”
“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”
“उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही”
“उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा”
‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचंय त्यामुळे…’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना